रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) सावदा येथून जाणाऱ्या भुसावळ चित्तोडगड महामार्गावर पिंपरुड रस्त्यावर आज दि. २ डिसेंबर गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी इंडिका व फॉर्च्यूनर या दोघा गाड्यांचा मोठा अपघात झाला आहे यात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी तर तीन किरकोळ जखमी झाले आहेत.
[ads id="ads2"]
या अपघातात तालुक्यातील वाघोदा येथील केळीचे व्यापारी भरत सुपे यांच्या पत्नी भावना भरत सुपे(४०) यांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या भावाच्या पत्नी विद्या काशिनाथ (गोटुशेठ)सुपे व मुलगा कृष्णा भरत सुपे तीघ राहणार मोठे वाघोदा हे जखमी आहेत तर इंडिका गाडीतील रावेर येथील Raver व्ही एस नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या
[ads id="ads1"]
परिवारातील रेखा हेमंत नाईक(४०) प्रतीक हेमंत नाईक (२०) प्रीती हेमंत नाईक (१८) तिचे राहणार रावेर हे जळगाव वरून लग्न समारंभ आटपून घराकडे जात होते हा अपघात एवढा भीषण होता की फॉर्च्यूनर गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे लिंबाच्या दोन वृक्ष तोडत शेजारच्या शेतात फेकली केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार पोलीस हवालदार उमेश पाटील संजय चौधरी हे करीत आहे.