या बाबत सविस्तर वृत्त असे की, वाघोदा खु येथे कार्यरत असलेले तत्कालीन ग्रामसेवक श्री शिवाजी सोनवणे यांनी १४ वा वित्त आयोगाच्या पाच वर्षांच्या प्राप्त अनुदानातून केलेल्या कामावर मजुरच लावलेले नाही, तसेच या ग्रामसेवकाने तब्बल १२ वर्ष स्वतः ची एन्जोप्लास्टी झालेली असतांना हृदय शस्रक्रिया झाल्याचे भासवून बदली टाकलेली होतो. [ads id="ads2"]
या वर्षी तक्रार झाल्याने वाघोदा खु येथून श्री सोनवणे यांनी काढता पाय घेतला तसेच श्री. राहुल रमेश लोखंडे यांनी रेंभोटा येथे ग्रामसेवक। म्हणून कार्यरत असताना बदली झाल्यावर देखील पाच- सहा वर्षे अनधिकृत पणे ग्रामपंचायतीचे दप्तर स्वतः जवळ ठेवल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे, तसेच श्री राहुल लोखंडे यांनी बनावट अपंग प्रमाणपत्र सादर करून वेळोवेळी बदलीचा लाभही पदरात पाडून घेतल्याचे उघड झालेले आहे. या दोघांविषयी पंचायत समिती स्तरावर वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात तक्रारी होऊनही विस्तार अधिकारी श्री सोनवणे त्यांना पाठीशी घालीत आहे, त्यामुळे वर्षभरापासून कुठलीही चौकशी न करणाऱ्या या अधिकाऱ्यावर कोसोदे यांनी कारवाई करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचेकडे केली आहे.