रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर शहरातील अमर स्टोअर्ससमोर लावलेली गोपाळ महाजन यांच्या मालकीची लंपास केलेली मोटारसायकल क्र. एमपी-१२-ई-४४६६ चा रावेर पोलीस स्टेशनच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात शोध लावला आहे. [ads id="ads1"]
पोलिसांनी आरोपी संदीप लहू धनगर वय ३५, रा. रमजीपूर, ता.रावेर यास Raver तालुक्यातील विवरे येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी गुन्हे शोध पथकातील पो. कॉ सुकेश तडवी, अमोल जाधव, विकार शेख, सचिन घुगे व विष्णू भील यांच्यामार्फत तपासचक्र फिरवून आरोपीस अटक केली आहे.