रावेर/यावल (सिद्धार्थ ठाकणे) निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर - यावल तालुका संयुक्त बैठकीत संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल तालुका उपाध्यक्ष पदी कैलाश लोहार यांची नियुक्ती करण्यात आली . [ads id="ads1"]
त्याप्रसगी जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख महेशजी तायडे , उपप्रमुख सदाशिव निकम , जिल्हा रोजगार मंचचे प्रमुख युवराज सोनवणे , जिल्हा उपप्रमुख अशोकभाई तायडे , फैजपुर विभाग प्रमुख भगवान अढाळे ( कोचुर सरपंच ) , विभागीय उपप्रमुख शांताराम तायडे , [ads id="ads2"] उपप्रमुख एकनाथ गाढे , रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे , उपप्रमुख नारायण सवर्णे , अनिल वाघ (धनगर ) सरचिटणीस सुधीर सैंगमिरे , कार्यध्यक्ष शरद बगाडे , रावेर तालुका युवक प्रमुख विजय धनगर , यावल तालुका युवक प्रमुख विशाल तायडे , शे . जलील , अरविद भालेराव , व इतर कार्यकर्त्यानि कैलाश लोहार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . " बहुजन हिताय , बहुजन सुखाय " या ब्रित वाक्याचे संघटना पालन करून पुढील वाटचाल करित आहे. संघटना कोणा एका जाति - धर्माची नसुन बहुजन समाजाची आहे .