मुक्ताईनगर(प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूसपण बहाल केलेले असल्याने त्यांचा जय जय कार करत बसण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आंबडकरी अनुयायांनी आत्मशोध घ्यावा, असे आवाहन आंबडकरी विचारवंत आणि सर्जन लेखक दीपध्वज कोसोदे यांनी महापरीनिर्वाणदिनी आयोजित अभिवादन कार्यक्रमात केले.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालया कडून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमात कोसोदे यांची प्रमुख उपस्थिती होती, त्यांनी आपल्या अभ्याससपूर्ण भाषणात बाबासाहेब यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप माळी यांनी केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा एल बी गायकवाड होते, या वेळी महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर सभागृहात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

