रावेर प्रतिनिधी : रावेर तालुक्यातील विटवा येथील २३ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धटना आज दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.[ads id="ads2"]
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रावेर तालुक्यातील विटवा येथील रहिवाशी आकाश वानखेडे (वय २३) या तरूणाने राहत्या घरात कुणीही नसतांना गळफास घेतल्याचे दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत Raver पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

