चाळीसगावातील कंत्राटी डॉक्टर ACB च्या जाळ्यात ; ६० हजाराची लाच घेतांना अटक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

  चाळीसगाव रूग्णालयात कोरोना काळात भाडेतत्वावर लावेलेल्या रूग्णवाहिकेच्या बिलांची पडताळणी करून लागणारे पत्राच्या मोबादल्यात ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे.[ads id="ads1"]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांच्या दोन रूग्णवाहिका आहे. कोरोना काळात चाळीसगाव ट्रामा सेंटर ते चाळीसगाव तालुक्यात ने-आण करण्यासाठी भाडेतत्वावर लावले होते. [ads id="ads2"]

  रूग्णवाहिकेच्या बिलाची पडताळणी करून वैद्यकीय अधिक्षकांसह सही व शिक्क्याच्या मोबदल्यात कंत्राटी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (वय-३८) रा. चौधरीवाडा चाळीसगाव याने ६० हजाराची लाचेची मागणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक २६ डिसेंबर. रोजी सापळा रचून संशयित आरोपी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद याला पैसे घेतांना रंगेहात पकडले. पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!