अँड.रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर हल्ला : अज्ञातांकडून दगडफेक

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांमध्ये संघर्ष चालू असून त्यातच आज राष्ट्रवादीच्या नेत्या अँड. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे या घटनेने खडसे समर्थक घराजवळ गर्दी जमली असून वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा :- चाळीसगावातील कंत्राटी डॉक्टर ACB च्या जाळ्यात ; ६० हजाराची लाच घेतांना अटक |[ads id="ads2"]  

आज दिनांक २६ डिसेंबर रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असतांना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला. 

हेही वाचा :- अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या कार हल्ल्याची विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार : आमदार चंद्रकांत पाटील 

याप्रसंगी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा ड्रायव्हर होता.  त्यांच्या गाडीच्या काचांवर आघात करण्यात आले. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना काही दुखापत झाली नाही. मात्र हल्लेखोर काही क्षणात फरार झाले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!