रावेर येथील तालुका माध्यमिक शिक्षक पतपेढीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. १५ पैकी १३ जागांवर सहकार पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे. तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.[ads id="ads1"]
एकूण ५५३ मतदारांपैकी ५१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने ८० टक्के मतदान झाले. तालुका माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटाच्या १०, महिला राखीव २, एनटी १, एस.सी/एस.टी १ व ओबीसी प्रवर्गाची १ अशा संचालक पदाच्या एकूण १५ जागांसाठी रविवारी निवडणूक घेण्यात आली. [ads id="ads2"]
यासाठी सरदार जी. जी. हायस्कूलमध्ये मतदान प्रक्रिया व मतमोजणी करण्यात आली. सकाळी मतदानासाठी शिक्षकांची मोठी गर्दी मतदान केंद्राच्या परिसरात दिसून आली होती. या निवडणूकीत सहकार पॅनलचा सर्वसाधारण गटातून १० जागांवर विजय झाला आहे. तर महिला राखीव गटाच्या दाेन जागांवर छाया सुनील महाजन, शारदा परेश सपकाळे ह्या तर ओबीसी प्रवर्गात एस. आर. पाटील असे तिघे सहकार पॅनलचे उमेदवार यापूर्वीच विजयी झाले असल्याने सहकार पॅनलने एकूण १३ जागांवर विजय मिळवला आहे. सर्वसाधारण गटातून संपूर्ण
१० जागांवर सहकार पॅनलचे विजयी झालेले उमेदवार असे:
प्रशांत कडू पाटील, प्रकाश सुरेश भोगे, प्रभाकर कडू पाटील, गोपाल त्र्यंबक पाटील, प्रवीण काशिनाथ सोनार, किशोर विश्वनाथ चौधरी, जितेंद्र मनोहर पाटील, योगेश सुधाकर बोरोले, दंगल काशिनाथ पाटील व राजेंद्र हरी कोकाटे. तर अनुसूचित जाती-जमाती जागेवर अपक्ष उमेदवार कृष्णा शामराव धंधरे तर एन. टी. प्रवर्गातून अपक्ष उमेदवार प्रवीण यशवंत धनगर विजयी झाले आहेत. सहकार पॅनल प्रमुख कुसुंबा विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. टी. महाजन यांच्यासह जे. के. पाटील, तुकाराम बोरोले, एन. व्ही. पाटील, शिरीष वाणी यावेळी मतदान केंद्रावर उपस्थित होते. दरम्यान या निकालामुळे उत्साह दिसत हाेता.

