रावेर तालुक्यातील रोझोदा येथील 39 वर्षीय तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवार, 26 रोजी दुपारी सुमारे दिड वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.[ads id="ads1"]
सावदा पोलिसात अकस्मात नोंद
सावदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन फेगडे हे रोझोदा, ता.रावेर येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. [ads id="ads2"]
रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरात घरातील वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेवून त्यांनी जीवनयात्रा संपवली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. नातेवाईक घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा :- हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव ; 32 जणांना लागण; कर्मचारी, पोलीस, पत्रकारांचा समावेश
या प्रकरणी धनराज पाटील यांच्या खबरीवरून सावदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवलदार विजय पोहेकर करीत आहे.

