मागासवर्गीय मुलांच्या रावेर येथील वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :-  राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रावेर (बऱ्हाणपूर रोड) येथे असून या वसतिगृहात सन २०२१-२२ या वर्षाच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आठवी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज वसितगृह कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत.[ads id="ads2"]  

   परिपूर्ण भरलेला अर्ज घेऊन शालेय विभाग व कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय विभागासाठी २० डिसेंबर,२०२१ पर्यंत तसेच व्यावसायिक शिक्षणासाठी ३१ डिसेंबर, २०२१ पर्यंत वसतिगृह कार्यालयात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम प्रवेश अर्जासोबत पहावयास मिळतील. विद्यार्थ्यांनी वरील पत्त्यावर संपर्क साधावा. वसतिगृह प्रवेश रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार दिला जाईल.  वसतिगृहात निवड झालेल्या प्रवेशितांना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साहित्यासाठी रुपये ४०००/- रोख तसेच दरमहा निर्वाह भत्ता रु. ५००/- व इतर अनुषंगिक सुविधा दिल्या जातात, असे गृहपालांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!