नाशिक (प्रतिनिधी) दिनांक 6 डिसेबर २०२१ सोमवार रोजी महाराष्ट्र सेना सर्प मित्र आघाडीची नाशिक येथे शासकीय विश्राम गृह येथे लोकनेते संस्थापक अध्यक्ष राजुभाई साबळे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सेना सर्प मित्र आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी सर्प मित्र गणेश गाडेकर यांची निवड उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे .[ads id="ads1"]
या वेळी गाडेकर हे गेल्या 12 वर्षांपासून वन्य जीव सर्प चळवळी मध्ये निसर्ग व पर्यावरणाचा समतोल राखून हजारों सापाचे प्राण व जनतेचे प्राण वाचवलेले असून राज्यासाठी भरीव कार्य करत आले आहे म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेऊन गाडेकर यांच्यावर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी पदाची जबादारी देण्यात आलेली आहे.[ads id="ads2"]
या निवडीचे स्वागत मराठवाडा अध्यक्ष अभिलाष जाधव विदर्भ अध्यक्ष सर्पमित्र एस बी रसाळ राज्य सचिव वनिता बोराडे मराठवाडा सचिव सर्प मित्र अमित अनर्थे नाशिक जिल्हा प्रमुख अमित घायवटे औरंगाबाद जिल्हा प्रमुख सर्प मित्र चंद्रकांत पाटील आदींनी या निवडीचे नाशिक जिल्हयातुन व राज्यभरातुन अनेक सर्प मित्रांनी स्वागत केले आहे.

