रावेर तालुक्यातील बनावट अपंग ग्रामसेवकांवर कारवाई होणार : अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 रावेर( प्रतिनिधी) गेल्या सहा महिन्यांपासून गाजत असलेल्या बनावट अपंग प्रमाणपत्र धारक ग्रामसेवक यांचेवर पुढील कारवाईसाठी पंचायत समिती रावेर येथील गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रा प) यांना अहवाल सादर केल्याने ग्रामसेवक यांचे धाबे दणाणले आहे.[ads id="ads1"] 

या बाबत सविस्तर वृत्त असे की, रावेर तालुक्यातील आठ पैकी पाच ग्रामसेवक यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिकल बोर्डाने अवैध ठरविल्याने व श्री नितिन महाजन( गहूखेडा), श्री राहुल रमेश लोखंडे, श्रीमती छाया रमेश नेमाडे, रवींद्रकुमार चौधरी आणि श्री शामकुमार पाटील या पाच ग्रामसेवक यांनी या बोगस प्रमाणपत्राच्या आधारे  रावेर तालुका अंतर्गत बदलीचा लाभ पदरात पाडून घेतल्याचे सिद्ध झाल्याने [ads id="ads2"] त्यांच्यावर पुढील कारवाईसाठी गट विकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेला अहवाल सादर केला आहे, त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.आता जिल्हा परिषद, जळगांव या ग्रामसेवकांवर नेमकी काय कारवाई करते, हे काही दिवसात कळेल. तक्रारदार यांचेशी संपर्क केला असता. बनावट पाचही ग्रामसेवक यांचेवर प्रशासकीय कारवाई बरोबरच फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पाठपुरावा केला जाईल, असे नजमुद्दीन शेख यांनी सांगितले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!