जखमी शेतकऱ्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.
निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भोकर भादली ता. जळगाव असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.[ads id="ads2"]
याबाबत माहीती वृत्त असे की, निवृत्ती गंगाराम साळुंखे हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला केळीची विक्री केली होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे आपल्या दुचाकीने सायंकाळी ५ वाजता किनोद येथे गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेवून ते दुचाकीवरून भोकर भादली येथे परतत होते. त्याच्यासोबत गावातील विठू उर्फ प्रकाश (पुर्ण नाव माहित नाही) हे देखील होते.
भोकर ते किनोद रस्त्यावर अज्ञात पाच जणांनी निवृत्ती यांची दुचाकी अडविली. निवृत्ती यांच्याकडे पैश्यांची मागणी केली असता त्यांच्यात शब्दिक बाचाबाची झाली. यात हल्ले खोरातील एकाने हातातील काठी निवृत्ती यांच्या डोक्याला मारली त्यात ते जखमी झाले. त्यांच्या खिश्यातील ५० हजाराची रोकड आणि गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जबरी हिसकावून तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत निवृत्ती यांनी त्यांचे चुलत भाऊ विजय गोपाल पाटील यांना फोनकरून घटनेची माहिती दिली. विजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून जखमी निवृत्ती पाटील यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

