विजेच्या धक्क्यात जखमी झालेल्या बालकाचा उपचारा दरम्यान मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

जळगाव (समाधान गाढे) कजगाव ता.भडगाव येथे आजी आजोबांच्या गावाला आलेल्या नऊ वर्षीय नातू चे विजेच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.[ads id="ads1"] 

  कजगाव येथील ब्रिजलाल दामू पाटील यांच्या मुलीचा तिसरीत शिक्षण घेणारा नऊ वर्षीय मुलगा दर्शन प्रशांत पाटील रा कावपिंप्री ता.अमळनेर येथील असून दोन दिवसांपूर्वीच तो आजी आजोबांकडे आला होता दर्शन हा दिनांक ११ रोजी आजोबांच्या घराच्या छतावर पतंग उडवीत होता.[ads id="ads2"] 

  पतंग उडवत असतांना त्याच पतंग हे छतावरून गेलेल्या विजेच्या तारांवर अडकले पतंग काढण्याच्या प्रयत्नात दर्शन याला विजेचा तीव्र धक्का बसला त्यात तो गंभीर जखमी झाला गंभीर अवस्थेत त्याला चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले डॉक्टरांनी खूपच शर्तीचे प्रयत्न करून ही जखमी बालक वाचू शकला नाही.

हेही वाचा :- यावल नगरपालिकेचा "कचरा" झाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात

अखेर  दिनांक १६ रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला मयत दर्शन याच्यावर शोकाकुल वातावरणात त्याच्या मूळगावी कावपिंप्री येथे अंत्यसंस्कार करण्यात आले घडलेल्या दुर्दैवी घटनेने कजगाव व कावपिंरी परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!