यावल दि.17( सुरेश पाटील) अमळनेर मार्गावरून जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या आणि एक्सप्रेस गाड्यांची लोकल तिकीट विक्री सेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी अमळनेर तालुका व शहर एआयएमआयएम तर्फे करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
अमळनेर तालुका अध्यक्ष अज़हरओद्दीन भाई,शहर अध्यक्ष सईद शेख,शहर उपाध्यक्ष मोईज़ अली सैय्यद,कलीम शेख,हाजी जलालोद्दीन,हसनभाई यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्यांनी अंमळनेर येथील रेल्वे स्टेशन मास्तर यांच्यामार्फत पश्चिम रेल्वेचे जीएम आलोक कन्सलजी जळगाव लोकसभा खासदार उन्मेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर रेल्वे स्टेशन वरून जाणारी सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू करण्यात यावी आणि संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा सुद्धा सुरू करावी.[ads id="ads2"]
कारन अमळनेर तालुक्यातील सर्व स्तरातील जनता आपल्या विविध कामासाठी अमळनेर येथून सुरत कडे आणि जळगाव भुसावळ कडे जा ये करीत असतात सकाळी सात वाजता भुसावळ कडे जाणारी सुरत भुसावळ पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करण्यात यावी कारण या गाडीने अमळनेर ते जळगांव दररोज हजारो लोक अप डाउन करतात तसेच 09078 भुसावळ नंदूरबार पॅसेंजर ही गाडी सुरत प्रयत्न सुरु करावी,अमरावती एक्स्प्रेस ही गाडी दररोज नियमित सुरू करण्यात यावी, विशेष म्हणजे पॅसेंजर गाडीचे टिकट दर आजही एक्स्प्रेसच्या नुसार घेतले जाते सदरील टिकीटाचे दर तात्काळ कमी करावे*, आणि संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा ही सुरू करावी अमळनेर रेल्वे स्थानकावरून जाणारे सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.