भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे)
जळगाव-नशिराबाद दरम्यानच्या महामार्गावरील सरस्वती फोर्ड शोरूमनजीक एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १३ रोजी घडली.
[ads id="ads1"] 

बापूराव चैत्राम शिलावट असे मृताचे नाव असून याप्रकरणी १४ रोजी ट्रक चालकाविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"] 

नशिराबाद येथील बापूराव शिलावट हे जळगावहून नशिराबादकडे (एमएच १९ डीटी ४०२६) या दुचाकीने येत असताना सरस्वती फोर्ड शोरूमजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक (आरजे ४७ जीए ९५४) याने जोरदार धडक दिली.

या धडकेत बापूराव चैत्राम हे गंभीर जखमी झाले. त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. यासंदर्भात मयताचा मुलगा दिनेश बापूराव सिलावट यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक चंद्रलाल हिरालाल (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरोधात मंगळवार १४ डिसेंबर रोजी दुपारी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!