तीन दिवसापूर्वी म्हणजेच दि. २३ डिसेंबर रोजी स. ११:३० वाजेच्या सुमारास मालीवाडा ईच्छापुर येथील दोन वर्षीय खुशी(रुशाली) ही चिमुकली खेळतांना घरासमोरुन अचानक गायब झाल्याची घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.[ads id="ads1"]
म.प्र.हद्दीतील शहापुर पोलिस स्थानकात मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन शोध मोहीम राबिवण्यात आली होती.पोलिसांनी खुशीला शोधुन काढले पण दुःखद ती मिळाली मृत अवस्थेत.[ads id="ads2"]
संपूर्ण वृत्त असे कि,तीन दिवसापूर्वी खुशी(रुशाली)दिलीप माली उ.व.०२रा.मालीवाडा इच्छापू्र ही चिमुकली खेळतांना घरासमोरुन अचानक गायब झाली होती त्या अनुषंगाने म.प्र.हद्दीतील शहापुर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असुन १५ पोलिसांची टीम शोध घेत होती.
हेही वाचा :- यावल शहरातील 25 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
दरम्यान काल दि. २५ रोजी शोध घेत असतांना दिलीप माली यांच्या घरापासुन २०० फुटावर असलेली विहीरीतुन दुर्गंधी मुळे पोलिसांची तपास चक्र त्या दिशेने फिरले व विहीरीतून मृतअवस्थेत गोनी मध्ये तिचा मृतदेह आढळुन आल्याने तिचा परिवाराने हंबरळा फोडला. संपूर्ण गाव परिसरात शोकाकुळ पसरली.
खुशी (रुशाली) च्या हत्या चे कारण अजूनही अस्पष्ट
मृत खुशी चा चेहरा काळसर पडुन जीभ बाहेर व तिचा मृतदेह रक्ताने माखलेला होता.मृतदेह मिळताच तातडीने शवविच्छेदनासाठी रात्रि ८:०० वा. बुरहानपुर जिल्हा रुग्णालयत पाठविण्यात आले. डाॅ.गौरव थवानी यांनी लागलीच डाॅ.प्रदीप चौधरी,डाॅ. विक्की चौकसे, डाॅ.सुरभी शाह यांची टीम तयार करुन शवविच्छेदन केले. प्रथम शार्ट पोस्टमाॅर्टम ची रिपोर्ट मध्ये खुशी(रुशाली)ची गळा दाबुन हत्या करण्यात आली तसेच तिचा सोबत अनुचित प्रकार घडले असावे असे निर्दर्शनात दिसुन येत असल्याची माहिती डाॅक्टरांची टीम ने दिली आहे.
हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यात "या"दिवशी अवकाळी पावसाची शक्यता...
मात्र ही हत्या चे कारण अद्याप अस्पष्ट असुन शहापुर पोलिस स्थानकात हत्या चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सुरु आहे लवकरात लवकर आरोंपीची शोध लागेल अशी माहिती बुरहानपुर एस.पी. राहुलकुमार लोढा यांनी दिली आहे

