Jalgaon : जिल्ह्यात "या"दिवशी अवकाळी पावसाची शक्यता...

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


मागील काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला असता त्यात जळगाव जिल्ह्यात ३० डिसेंबर रोजी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. [ads id="ads1"] 

  जळगावचे किमान तापमान ९ अंशांवर असून, पुढील दोन दिवस पारा १० अंशांपर्यंत राहू शकते. बदलत्या वातावरणामुळे एन हिवाळ्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी राज्यातील विविध भागासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. [ads id="ads2"] 

  अशातच आता हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या ३० डिसेंबरपर्यंत तापमानात किंचित वाढ होईल. ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी होऊ शकते. ३० डिसेंबरला राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. नववर्षाचे स्वागत पावसाने होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. गेल्या तीन दिवसांपासून वाढ झालेल्या थंडीची तीव्रता कायम असून, गुरुवारी किमान तापमानात दोन अंशांनी वाढ झाली आहे. 

  ७ अंशांपर्यंत असलेले तापमान गुरुवारी ९ अंश सेल्सिअसवर होते. तर दिवसाच्या कमाल तापमानातही काहीसी वाढ होऊन तापमान ३१.४ अंशांपर्यंत वाढले होते. उत्तरेतील थंड वारे राज्यात धडकल्याने जिल्ह्यात थंडीची लाट आली होती. थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यातील किमान तापमान नीचांकी ७.३ अंश सेल्सिअस एवढ्या नीचांकी पातळीवर गेले होते. त्याचा परिणाम म्हणून राज्यात जळगाव सर्वाधिक कूल होते. थंडीच्या लाटेमुळे गारठ्याची तीव्रता तेवढीच असून, तापमानात मात्र किंचित वाढ झाली आहे. जळगावचे किमान तापमान ९ अंशांवर असून, पुढील दोन दिवस पारा १० अंशांपर्यंत राहू शकतो..

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!