रावेर तालुका प्रतिनिधी(राजेश रायमळे)
तामसवाडी ता.रावेर येथे कोविड १९ कोविशिल्ड लसीकरण नुकतेच पार पडले.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की,तामसवाडी ता.रावेर येथे आज दि.२५ डिसेंबर २०२१ शनिवार रोजी सकाळी १० वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत जि.प. मराठी मुलांची शाळा तामसवाडी येथे कोविड १९ कोविशिल्ड लसीकरण लसीकरण नुकतेच संपन्न झाले.[ads id="ads2"]
तामसवाडी गावात हे लसीकरणाचे ५वे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळेस सर्वच आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली, ग्रामस्थांनी लसीकरणाचा लाभ घेतला.यावेळेस त्यांना आशा वर्कर सुरेखा नेमाडे आणि आंगणवाडी सेविका संगिता खैरे यांचे सहकार्य लाभले.

