यावल दि.26(सुरेश पाटील) बामणोद-आमोदे हा शिवरस्ता मोकळा करण्यासाठी फैजपुर भाग मंडळ अधिकारी यांनी दि. 16डिसेंबर2021रोजी यावल तालुक्यातील विरोदे येथील दगडू चिंतामण कोळी या शेतकऱ्यास लेखी सूचना पत्र देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी लेखी सूचना देण्यात आली आहे.[ads id="ads1"]
परंतु या शिव रस्त्याबाबत यावल न्यायालय व जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय भुसावळ यांनी अनुक्रमे दि.1/11/2011रोजी व दि.23/10/2021रोजी ऑर्डर करून प्रतिवादी किंवा त्यांचे एजंट,नोंकर,कर्मचारी किंवा इतर कोणीही गट नंबर 367 मधून कायमस्वरूपी "जा" "ये" करू नये किंवा कोणतीही वाहने नेऊ नयेत असा आदेश केलेला आहे.[ads id="ads2"]
असा आदेश न्यायालयाने जर केला आहे तर यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह फैजपुर मंडळ अधिकारी,बामणोद मंडळ अधिकारी यांनी कार्यवाही केल्यास तेथे उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी न्यायालयाचा अवमान करणार असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तहसीलदार महेश पवार यांनी दि.28/10/2021 रोजी बामणोद येथील मंडळ अधिकारी यांना दिलेल्या आदेशानुसार बामणोद मंडळ अधिकारी यांनी दि.18/11/2021रोजी दगडू चिंतामण सोनवणे राहणार विरोदे या शेतकऱ्यास एक समज पत्र दिले आहे.तसेच फैजपूर भाग मंडळ अधिकारी यांनी सुद्धा दि.16/12/2021रोजी दगडू सोनवणे या शेतकऱ्यास बामणोद-आमोदे हा शिवरस्ता मोकळा करताना शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे अन्यथा शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी,असा इशारा दिला आहे.यावल तहसीलदार आणि बामणोद फैजपूर मंडळ अधिकारी यांना न्यायालयाच्या आदेशाची माहिती नाही का?असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित केला जात असून यांनी रस्ता मोकळा करून दिल्यास यावल न्यायालय व भुसावळ येथील जिल्हा सत्र न्यायलयाचा अवमान केला जाणार असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
अडीच कोटीचा पुल दुसऱ्या जागेवर 10 लाखात केला !!
प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेला फासला हरताळ ?
दोन कोटी 66 लाख रुपयाचा पुल ??
गेल्या दहा वर्षापूर्वी प्रधान मंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत यावल तालुक्यात बामणोद-विरोदा ते फैजपूर रस्त्यावरील नदीवर 2 कोटी 66 लाख 8 हजार 845 रुपयाचा पुल बांधकाम झाल्याचे दाखविण्यात आले आहे,या पुलाचे बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे ज्या ठिकाणी करायचे होते त्या ठिकाणी न करता दुसऱ्या ठिकाणी अंदाजे फक्त 10 लाख रुपयात पुलाचे बांधकाम करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.या पुलाचे बांधकाम दुसऱ्या ठिकाणी झाल्यानंतर रस्ता वापरण्यासाठी वाद निर्माण झाला आणि विरोदा येथील दगडू चिंतामण कोळी या शेतकऱ्याने सन2009मध्ये यावल येथील न्यायालयात जळगाव जिल्ह्यातील आसोदा येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तुषार रमेश महाजन यांच्या विरुद्ध यावल न्यायालयात प्रकरण दाखल केले होते आणि आहे या प्रकरणाचा निकाल दगडू चिंतामण कोळी या शेतकऱ्यांच्या बाजूने सन 2011 अखेर लागला आहे यात तुषार रमेश महाजन या ठेकेदारास कायदेशीर मोठी चपराक बसलेली असताना आता पुन्हा या वादग्रस्त शेतीशिवार रस्त्याचा ताबा घेण्याचे षडयंत्र महसूल विभागामार्फत सुरू झाले आहे हे प्रकरण चांगलेच रंगणार असून हा 2 कोटी 66 लाख 8 हजार 845 रुपयाचा पुल मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहे की दुसर्या ठिकाणी दोन कोटी रुपया ऐवजी फक्त काही लाखात का ? व कोणाच्या आशीर्वादाने पूल बांधला गेला ? याची चौकशी करण्यासाठी पुढील कार्यवाही होण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन जळगाव जिल्हा संघटक सुरेश जगन्नाथ पाटील संबंधित सर्व अधिकाऱ्यांकडे रीतसर लेखी तक्रार करणार आहेत.

