जळगाव प्रतिनिधी : आनंदशाली हितकारिणी बहुद्देशीय संस्था संचलित "प्रपंच वधू-वर सूचक केंद्रा" तर्फे बौद्ध समाजाचा वधू-वर परिचय मेळावा रविवारी वाघनगरातील यशवंत भवनात पार पडला. या मेळाव्यात २५ युवक-युवतींनी परिचय दिला.[ads id="ads2"]
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती, या कार्यक्रम परिचय पुस्तिकेचे प्रकाशन झाले. आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात, कोविड काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील व बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.[ads id="ads1"]
यावेळी सरकारी नोकरी असलेला जोडीदार हवा, अशी अपेक्षा युवतींनी व्यक्त केली. परिचयानंतर यूवक-मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. युवतींच्या पालकांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेंद्र जाधव यांनी सांगितले,
यावेळी प्रपंच वधू-वर सूचक केंद्राच्या अध्यक्षा अँड, सीमा बिऱ्हाडे, प्रा. आनंद ढिवरे, गौतम ढिवरे,जनक्रांती मोर्चाचे मूकंद सपकाळे,संदीप सौमिरे, बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक एस्. पी, जोहरे, जिल्हा कोषाध्यक्ष बी.एस. पवार, शहर शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिल शिरसाळे, संतोष गायकवाड आदीमान्यवरांची या सोहळ्याला उपस्थिती होती.

