रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने रावेर शहरातून आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींचे किमत असलेले ब्राऊन शुगर जप्त केले आहे. परराज्यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून अटक केली असून संशयीताकडील प्रतिबंधीत ड्रग्ज ब्राऊन शुगर असल्याची दाट शक्यता आहे.[ads id="ads2"]
परराज्यातील दोघांना अटक
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नेतृत्वाला पथकाला संशयीताबाबत माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळी सापळा रचण्यात आला.
हेही वाचा : - रावेर तालुक्यात अवैध दारू विक्री करणाऱ्या जेवणाच्या ढाब्यांवर कारवाई
संशयीत आल्यानंतर त्यांच्याकडील कोट्यवधी रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले.यंत्रणेकडून जप्त ब्राऊन शुगरची मोजणी सुरू असून सायंकाळपर्यंत रावेर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :- भरधाव रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू ; जळगाव तालुक्यातील भादली जवळील घटना

