अमळनेर - तालुक्यातील तरवाड़े येथील सरपंचांविरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणी करणाऱ्या नाशिक येथील महिला वकीलासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला वकीलाविरुद्धचा हा दुसरा गुन्हा आहे.[ads id="ads1"]
अॅड. अलका मोरे शेळके (नाशिक) व शरद उखा पाटील (तरवाडे ता. अमळनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
तरवाडे येथील सरपंच रामकृष्ण अभिमन पाटील हे १६ रोजी मारवड येथून परतत होते. धानोरा फाट्याजवळ समोरून येणाऱ्या पांढऱ्या कारच्या चालकाने हात देऊन थांबवले त्यातून वरील दोन जण खाली उतरले. त्यावेळी पाटील याने सांगितले की, आम्ही तुमच्याविरुद्ध सर्व ठिकाणी तसेच कोर्टात देखील तक्रार दाखल केली आहे.[ads id="ads2"]
ती तक्रार मागे घ्यायची असेल तर दोन लाख रुपये द्या. यापुढे प्रत्येक कामात दोन टक्के कमिशन द्यावे लागेल. अन्यथा तुम्हाला किंवा तमच्या परिवारातील कोणालाही मारून टाकू. तसेच तू कामानिमित्त कुठेही जात येत असतो, तुला दुखापत करू अशी धमकी दिली. रामकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ. सुनील तेली करीत आहेत.
यापूर्वी देखील मारवड पोलीस स्टेशनलाच एका तरुणीला अश्लील फोटो व्हायरल केल्याची धमकी देऊन खंडणी मागितल्यावरून खंडणीचाच गन्हा दाखल झाला होता..

