यावल वार्ताहर (सुरेश पाटील) पोलीस स्टेशन हद्दीत काही तोतया पत्रकारांनी अधिकारी कर्मचारी यांच्यावर लक्ष केंद्रित करून काही व्यवसायिकांना कायद्याचा आणि आपला सामाजिक वर्चस्वाचा धाक दाखवून ब्लॅकमेल करण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. त्यामुळे यावल पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित करून या तोतया भटकंती करणाऱ्यां बोगस (अधिकृत पत्रकार वगळता) पत्रकारा विरुद्ध कारवाई करावी असे प्रसिद्धी माध्यमांमध्ये बोलले जात आहे.
[ads id="ads2"]
अवैध बोगस ओळख पत्र तयार करून परिसरात या बोगस पत्रकारांनी चौफेर भटकंती करून काही व्यापार्यांना आणि व्यवसायिकांना अनधिकृत व्यवसायाची धमकी देऊन धुमाकुळ माजविला आहे.तसेच ते दोन तोतयागिरी करणारे पत्रकार आहेत का?आणि ते असे का वागतात हे उघडपणे संबंधितांना सरळ आम्हाला पैसे द्या असे बोलत असतात काही जण तर आपले घरदार व गाव सोडून सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी तोतयागिरी करीत असतात यात काही जण तर रस्त्यात वाहने अडवून पैशांची मागणी करीत आहे याबाबत यावल पोलिसांनी त्यांना प्रत्यक्ष बोलावून जाब जबाब घेऊन कायदेशीर रित्या खात्री करून घ्यावी जेणेकरून अधिकृत चांगले कामकाज करणाऱ्या पत्रकारांची बदनामी होणार नाही असे यावल तालुक्यात बोलले जात आहे.
अवैध वाळू वाहतूकदारांकड़े हे कोणत्या अधिकाराने आणि नियमानुसार पावत्या मागतात हा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहे तसेच हे सर्व सामान्य जनतेची आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुद्धा दिशाभूल करून आर्थिक लूट करीत असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.यात तालुक्यातील शासकीय कार्यालयातील काही शिपाई कोतवाल सुद्धा या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने यावल पोलिसांनी तात्काळ याकडे लक्ष केंद्रित करून कडक कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.
