रावेर( प्रतिनिधी) वाघोदा खुर्द येथील तकालीन ग्रामसेवक शिवाजी सोनवणे यांनी एन्जोप्लास्टी झालेली असतांना ह्र्दय शस्रक्रिया झाल्याचे भासवून तब्बल बारा वर्षे बदली टाळून एकाच ग्रामपंचायतीस ठाण मांडले होते.[ads id="ads2"]
याच ग्रामसेवकाने १४ वा वित्त आयोगाच्या पाच वर्षांच्या कामावर एकही मजूर न लावता कामे केल्याचा विक्रम केला आहे, पंचायत समिती पर्यायाने शासनाची फसवणूक करणाऱ्या ग्रामसेवकास प्रशासन पाठीशी घालत असल्याने तक्रारदारास दिनांक ९ डिसेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगांव यांच्या रावेर तालुका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला आहे, तक्रारदाराच्या या इशाऱ्यानंतर तरी पंचायत समितीच्या निगरगट्ट प्रशासनास जाग येते काय? हे पाहणे उत्सुकतेचे आहे.

