हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS जनरल बिपीन रावत समवेत १३ जणांचा मृत्यू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

तामिळनाडूमधील कुन्नूरमध्ये संरक्षण दलाचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नीचा समावेश आहे.
[ads id="ads1"] 

हेलिकॉप्टरचा अपघात झाला त्यावेळी ते त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले.[ads id="ads2"] 

बिपिन रावत यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला आणि देशातील पहिले CDS अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. भारतीय सीडीएस अधिकारी बनलेली बिपिन रावत हे पहिली व्यक्ती आहे. CDS म्हणजेच संरक्षण कर्मचारी हे अधिकारी आहेत जे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यातील समन्वयासाठी काम करतात आणि संरक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांचे मुख्य सल्लागार आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!