यावल दि.26( सुरेश पाटील) नॅशनल हायवे क्र.6 चे बांधकाम बरेच अपूर्ण असल्याने वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.[ads id="ads1"]
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि.20 डिसेंबर2021 रोजी नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नॅशनल हायवे क.6 हा राष्ट्रीय महामार्ग तरसोद ते चिखली जळगांव व बुलढाणा जिल्हातून जातो.[ads id="ads2"]
सदर रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे असे "नाही" चे अधिकारी म्हणतात त्यानुसार 15/08/2021पासून नशिराबाद जवळ टोल नाका उभारून टोल वसुली केली जात आहे.परंतू खालील कामे अपूर्ण आहे जसे की,रेल्वे पूल,गटार,त्याचा त्वरीत पाठपुरावा व्हावा.रस्त्याचे दोन्ही बाजूस माहिती दर्शक फलक लावावे.प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून आवश्यक Sign Board, Caution Board वेग मर्यादेचा बोर्ड,झोन,वळण ईत्यादी फलक लावावे.काम सुरू होऊन पूर्णत्वास आले मात्र रस्त्याचे दूर्तफा असलेले 50 ते 60 वर्षा पूर्वाचे मोठे वृक्ष तोडण्यात आले मात्र प्रकल्प अहवालानुसार त्याप्रमाणात दोन्ही बाजूस नवीन वृक्ष रोपण करण्यात आलेले नाही.
काही ठिकाणी वृक्षारोपण केले आहे मात्र त्यात उष्ण कटिबंध प्रदेशात होणारी व वाढणारी टिकाऊ झाडे उदा. कडूलिंब,चिंच,कैठ,वड,पिंपळ, आंबा यासारखी झाडे लावावी ज्यातून सावली पण मिळेल व फळ झाडांपासून उत्पनही मिळेल.आरटीओ व पोलीस खाते हायवे वर वाहनाचा वेग मयदिबाबत जबरदस्तीने दंड आकारणी करीत आहे.मात्र वेग मयदिच्या सुचना फलक कोठेही दिसुन येत नाही.जुना हायवे जो भाग जळगांव शहर व खेडी,मन्यारखेडा तरसोद शिवारातून जातो त्या भागातील खड्डे व साईड पटया त्वरीत बुजवाच्या व त्या भागातील काम ज्या एजन्सीला दिले आहे.त्यांना त्वरीत रुंदीकरण व मजबुतीकरण करून मोऱ्या,पूल बांधकाम
सुरू करणे बाबत आपल्या मार्फत तात्काळ सुचना कराव्यात अशी मागणी नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करून निवेदनाच्या प्रती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव, जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव,प्रकल्प संचालक पीआययू जळगाव यांना दिल्या आहेत तरी "नही", प्रकल्प संचालक अधिकारी काय कारवाई करतात याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष वेधून आहेत.

