रावेर (समाधान गाढे) : एक कोटींच्या ब्राऊन शुगर प्रकरणी अटकेतील अख्तरी बानो अब्दुल रऊफ (45, रा.मोमीनपुरा बडा, कमेलापास, ता.जि.बऱ्हाणपूर) व पुरवठादार सलीम खान शेर बहादुर खान (किटीयानी कॉलनी, मनसौर, मध्यप्रदेश) यांना जळगाव गुन्हे शाखेने अटक केली होती.[ads id="ads1"]
आरोपींना सुरूवातीला 24 ते 29 दरम्यान तीन वेळा पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर भुसावळ सत्र न्यायालयात न्या.आर.एम. जाधव यांच्या न्यायासनापुढे हजर केले असता संशयीतांना 12 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. [ads id="ads2"]
यावेळी सरकारी वकीलांनी पोलिस कोठडी मागणी केली मात्र ती फेटाळण्यात आली. आरोपी अख्तरी बानोतर्फे ॲड.सत्यनारायण पाल तर आरोपी सलीमतर्फे अॅड. लतीब एच. पिंजारी तर सरकार पक्षातर्फे अॅड. मोहन देशपांडे यांनी युक्तीवाद केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.

