रावेर तालुक्यातील विवरे बु येथे घाणीचे साम्राज्य ग्राम पंचायत चे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे)

सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील विवरे बु. येथे भाटखेडा रोड तांडा बेघर प्लॉट महिला शौचालया जवळ घाण कचरा मोठ्या  प्रमाणात  आढळत आहे आणि वाघाडी नाला पुलाजवळ चा गटारीतील गळ घाण काढणे व  शे . असिफ शे शरीफ . यांच्या घरा जवळ असलेला गटारी वरिल धाप्याचे काम अपूर्णच आहे.[ads id="ads1"] 

  व त्या परिसरातील कुड कचरा उचलणे व स्वच्छता अभियान राबवणे बाबत असमर्थता दिसत  असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजगी व्यक्त होत आहे .व विवरे येथील त्रस्त झालेले  मतदार व रहीवाशी यांनी ग्रामसेवक सरपंच ग्राम  पंचायत विवरे बु. यांना विनंती अर्ज करण्यात आला होता.[ads id="ads2"] 

   की वरील विषय हा पर्यावरण आरोग्य व स्वच्छते बाबत दैनंदिन घडणारा गंभीर स्वरूपाचा व शारीरिक दृष्ट्या हाणी पोहोचणारा प्रश्न आहे तरी सदर सरपंच व ग्रामसेवक यांनी या बाबत प्रश्नांची पडताळणी करावे व गावातील नागरीकांच्या  समस्यांचे निवारण करावे विवरे बु. गावातील सांडपाणी व भाटखेडा रोड व बसस्टॅड व संपूर्ण गावातील प्रदूषित पाण्याचा प्रवाह हा वाघाडी नाला पुलाजवळ  येऊन थांबतो त्यांचे थांबण्याचे कारण त्या ठिकाणी असलेल्या  गळ किंवा कुडकचरा ग्रामपंचायत  कर्मचारी गटारीतील घाण काढून वर टाकतात.

 त्याला उचलत नाही व प्रदूषित पाण्याला वेग प्रवाह मिळत नाही म्हणून ही परिस्थिती निर्माण होत असते व हा दैनंदिन घडामोडी चा प्रश्न असल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास हाणी पोहचविणारा गंभिर स्वरूपाचा प्रश्न आहे. पर्यावरण प्रदूषण  आणि पाणी प्रदूषित या समस्यांपासून गावातील लोकांच्या आरोग्य बाबतचा गंभिर प्रश्न सोडवण्यात यावा.

  या प्रश्नांचे निवारण करणे हे स्वच्छता अभियान अंतर्गत येणारा विषय हा ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी सरपंच यांचे कर्तव्यदक्ष आहे . जसे रोज गावातील घाण कचरा उचलण्यात येतो त्याच प्रकारे प्रभाग क्रमांक पाच वाघाडीनाला व भाटखेडा रोड  तांडा बेघर प्लॉट  महिलांच्या संडाशी जवळील  परिसरातील घाण कचरा व वाघाडी नाला पुलाजवळील गळ कुडा कचरा उचलण्यात यावे वार्डात परिसराकडे लक्ष केंद्रित करावे निवडून आलेले सरपंच व मेंबर यांनी सर्वांनी पाहणी करण्यात यावी .

याबाबतची माहिती वार्डात पाहणी केल्यावरच  लक्षात येईल सदर हा कचरा उचलुन गावाबाहेर टाकण्यात यावे व प्रत्येकी तीन चार दिवसानंतर या परिसरातील कुड कचरा उचलण्यात यावा . तसेच गावातील नागरिक लहान मुलाबाळांचा प्रश्न व पर्यावरण आरोग्य विषयी चे प्रश्न हा वेळोवेळी उद्भवू नये म्हणून ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात यावे. व घाणीचे साम्राज्य दूर करावे . व शे . आसिफ शे. शरीफ .हिरामण शंकर गाढे .शे . इकबाल .शे .बाबु . कुरेशी यांच्या घरा जवळची गटारी वरिल धाप्याचे काम अपुर्ण आहे तरी या धाप्याचे काम पूर्णकरावे  व भाटखेडा रोड महिला शौचालया जवळची  घाण कचरा उचलण्यात यावा अशी अपेक्षा विवरे येथिल  रहिवाशी मतदार नागरीक ग्रामस्त करीत आहेत .

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!