भुसावळात ३३ किलो गांजा जप्त ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 
भुसावळ शहरातील बस स्थानक पतीसरात चारचाकी वाहनाने गांजा येत असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना गुपित माहिती मिळाल्याने सोबत पथक घेऊन खात्री केली असता एका वाहनांमध्ये ३३ किलो गांजा आढळून आला आहे. [ads id="ads1"] 

  सविस्तर बातमी अशी  की, रात्रीची नाईट पेट्रोलिंग करीत असतांना बाजारपेठ ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की भुसावळ शहरात विक्रीसाठी वाहनाने गांजा येत आहे. [ads id="ads2"] 

  या माहितीच्या आधारे पथक घटनास्थळी रवाना झाले. बातमीची खात्री करून सापळा रचून वाहनासह ३३ किलो गांजा व आरोपींना पहाटेच्या वेळेस ०३:०० वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिलीप भागवत, सपोनि मंगेश गोंटला, जीवन कापडे, प्रणित जांगडे अशांनी मिळून केली. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची सर्वात मोठी कारवाई आहे.

महाराष्ट्र शासनाचे 31 डिसेंबर संदर्भात नवीन आदेश लागू करण्यात आले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी भुसावळ शहरातील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानेदिनांक 30/12/2021 रोजी रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे स्टेशन चौकी समोर नाकाबंदी कर्तव्य दरम्यान सपोनि मंगेश गोंटला, पोहवा/2552 लतीफ शेख , पोकॉ/ 131 प्रणय पवार असे नाकाबंदी करीत असतांना संशयित वाहने चेक करीत होते.

दरम्यान 02.25 वाजेचे सुमारास 1 संशयित मारुती स्विफ्ट कार MH 01 BT 6682 अशी थांबवून विचारपूस केली असता गाडीत ड्रायव्हर व एक इसम नामे नंदकिशोर गवळी यांच्या हालचाली संशयित वाटू लागल्याने त्यांच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता डिक्कीतून प्लॅस्टिक बॅग मिळून आल्या. त्या चेक केल्या असता त्यात गांजा सदृश पदार्थ दिसून आल्याने लागलीच पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना फोनवरून कळवले असता ते तेथे तात्काळ हजर होऊन खात्री करून आरोपी 1) विजय वसंत धिवरे

2) नंदकिशोर हिरामण गवळी अशांना पोलीस स्टेशन येथे आणून Ndps कलम 20,29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!