विवरे येथे आ.शिरीष चौधरी यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपुजन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर प्रतिनिधी (समाधान गाढे) रावेर तालुक्यातील विवरे बु येथे रावेर -यावल मतदार संघाचे आमदार श्री शिरीष दादा चौधरी माजी आमदार अरुण दादा पाटील व  तसेच रावेर पं . स .सदस्य योगेश सोपान पाटील .व जिल्हा किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष सोपान बाबुराव पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भुमिपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
[ads id="ads1"] 

सविस्तर वृत्त असे की रावेर तालुक्यातील वाघोदा पंचायत समिती गणातील मौजे विवरे बु येथे पंचायत समिती सदस्य  श्री योगेश सोपान पाटील यांच्या निधीतुन विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पन सोहळा  दि १९ डिसेंबर रोजी  येथे संपन्न झाला.[ads id="ads2"] 

त्यावेळी रावेर यावल मतदार संघाचे आमदार मा. श्री. शिरिष दादा चौधरी यांच्या हस्ते RO फिल्टर व वाटर चिलर व ए. टि. एम .चे लोकार्पण करण्यात आले मा. श्री. श्रीराम दादा पाटील यांच्या हस्ते संजय पुंडलीक चौधरी यांच्या घरा जवळी रस्ता काँक्रीटीकरण भुमिपुजन करण्यात आले.


तळेकरवाडा येथे फ्लेवर ब्लॉक व भुमीपुजन करणात आले, तसेच लक्ष्मीनगर येथे गटारीचे भुमिपुजन श्रीराम पाटील व श्री आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी जिल्हा किसान सेल चे अध्यक्ष सोपान पाटील, रा. का . ता. अध्यक्ष निळकंठ चौधरी, रावेर येथील गोटु शेठ महाजन, पंचायत समिती सदस्य योगीता ताई वानखेडे, शिक्षण विकास मंडळ चेअरमन धनजी लढे, अध्यक्ष मार्तंड गणपत भिरूड, किशोर सोपान पाटील, विवरे बु सरपंच व ग्रामपंचायत सदस्य विवरे खुर्दे सरपंच व ग्रामपंचात सदस्य व पदाधिकारी यांची व नागरीकांची  उपस्थिती होती

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!