गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


जळगाव (राहुल डी गाढे) महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे आज सोमवार,  दिनांक 20 डिसेंबर,  2021 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे[ads id="ads1"] 

सोमवार, दिनांक 20 डिसेंबर, 2021 सकाळी 7:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण. सकाळी 8.50 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व चोपड्याकडे प्रयाण.[ads id="ads2"] 

  सकाळी 10.00 वाजता चोपडा येथे आगमन व चोपडा नगरपरिषद आयोजित सुवर्ण महाराष्ट्र जयंती नगरोत्थान महाअभियानातंर्गत चोपडा शहरात नवीन पाणीपुरवठा योजना उद्घाटन समारंभ. दुपारी 12.00 ते 1.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस मेळावा. दुपारी 1.00 ते 1.30 अरुणभाई गुजराती, माजी विधानसभा अध्यक्ष यांच्या निवासस्थानी राखीव. 1:45 ते 2:15 वाजता चोपडा तालुका सहकारी सूतगिरणी जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पाचे भूमिपुजन

दुपारी 2.15 वाजता चोपडा येथून जळगावकडे प्रयाण. 3.15 वाजता जळगाव येथे आगमन. 3:15 ते 4.00 पर्यंत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या नवीन निवासस्थान इमारतीचे उद्घाटन. 4.00 ते 5.30 पर्यंत नाशिक परिक्षेत्र अंतर्गत कायदा व सुव्यवस्था व इतर विषयांच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्यासमवेत बैठक. 5.00 ते 6.30 पर्यंत अजिंठा विश्रामगृह येथे राखीव. 6.30 वाजता जळगाव विमानतळाकडे प्रयाण व 6:45 वाजता आगमन. 7.00 वाजता खाजगी विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे प्रयाण

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!