रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
मराठा सेवा संघाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी योगेश पाटील, जिल्हा संघटकपदी, प्रशांत पाटील, जिल्हा विधी सल्लागार पदी अॅड.व्हि.पी महाजन
[ads id="ads1"] मराठा सेवा संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील आणि जिल्हा समन्वयक दिनेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.१२ डिसेंबर रविवार रोजी बैठक झाली. त्या बैठकीत रावेर येथे मराठा सेवा संघाच्या रावेर तालुकाध्यक्षपदी योगेश साहेबराव पाटील, जळगाव जिल्हा संघटक पदी प्रशांत पाटील आणि जळगाव जिल्हा विधी सल्लागार म्हणून अॅड.व्हि.पी. महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. [ads id="ads2"]
सदर बैठक रावेर तालुका सहकारी शेतकरी खरेदी-विक्री संघात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मराठा सेवा संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, जिल्हा समन्वयक दिनेश कदम, किशोर पाटील, संभाजी ब्रिगेडचे रावेर तालुकाध्यक्ष विनोद चौधरी, शहराध्यक्ष मोरेश्वर सुरवाडे, कार्याध्यक्ष योगेश महाजन, बोदवड संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटील, घनश्याम पाटील, ऍड.धनराज पाटील, बबलू सावंत, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, भगवान गायकवाड, रितेश बोरनारे, जितेंद्र कोळी आदींसह मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

