जिल्हाधिकारी यांच्यासह गट विकास अधिकारी,वाघोदा खुर्द सरपंच,ग्रामसेवक,यांचे अतिक्रमणाकडे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 तक्रार अर्ज आणि माहिती अधिकार अर्ज कचरापेटीत

यावल (सुरेश पाटील) रावेर तालुक्यातील वाघोदा खुर्द येथील शासकीय मालमत्ता जागा क्र.55 वरील अतिक्रमणाबाबत संबंधित  ग्रामस्थांने जिल्हाधिकारी जळगाव,पंचायत समिती रावेर गटविकास अधिकारी यांच्यासह वाघोदा खुर्द येथील सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे वेळोवेळी लेखी तक्रार केली आहे परंतु कार्यवाही न करता अर्जदाराचे माहिती अर्ज सुद्धा कचरापेटीत टाकण्यात आले आहेत.[ads id="ads1"] 

         याबाबत सविस्तर माहिती अशी की वाघोदा खुर्द येथील अरुण शांताराम कोल्हे यांनी शासकीय मालमत्ता क्रमांक 55 जागेवर सिकंदर गंभीर पटेल,शब्बीर सिकंदर पटेल,मंजीर गंभीर पटेल,जगदीश शिवराम ठोसरे यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती आणि आहे परंतु याबाबत वरील संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी अद्याप कारवाई न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.[ads id="ads2"] 

        याबाबत सविस्तर माहिती अशी की वाघोदा खुर्द येथील अरुण शांताराम कोल्हे यांनी वाघोदा खुर्द येथील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अतिक्रमणाबाबत दि.16फेब्रुवारी2021रोजी जिल्हाधिकारी जळगाव त्यानंतर दि.8/7/2021रोजी पंचायत समिती रावेर गट विकास अधिकारी,दि.2/8/2021रोजी जिल्हाधिकारी जळगाव,दि.1/9/ 2021रोजी तहसीलदार रावेर यांच्याकडे लेखी अर्ज दिले होते आणि आहेत याबाबत कार्यवाही काय करण्यात आली ही माहिती मिळण्यासाठी दि.10 मे 2021 रोजी वाघोदा खुर्द येथील ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे माहितीचा अर्ज देण्यात आला होता आणि आहे त्यानुसार ग्रामसेवकाने संबंधित अतिक्रमण धारक सिकंदर पटेल,शब्बीर पटेल,मंजूर पटेल,जगदीश ठोसरे यांना नोटिसा दिलेल्या आहेत.

हेही वाचा : - टेहू येथील जवानाचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू 

         यानंतर जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे अरुण कोल्हे यांनी माहितीचा अर्ज दिल्यानंतर माहिती देणे संदर्भात रावेर पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातून दि. 12/5/2021रोजी माहितीचा अर्ज वर्ग करण्यात आला होता आणि आहे.यानुसार रावेर पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी वाघोदा खुर्द ग्रामपंचायतीस दि.13जून 2021रोजी र.पो.ने पत्र देऊन कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याचे कळविले होते. अतिक्रमणाबाबत पत्री कागदी घोडे नाचविण्यात आले असले तरी तक्रारदाराचे मूळ अर्ज कचरा पेटीत टाकून अतिक्रमण जैसे थे असल्याने वाघोदा खुर्द ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून अतिक्रमण संदर्भात यापुढे सरळ वाघोदा खुर्द ग्रामसेवक आणि सरपंच सदस्य यांच्यावर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!