रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
रावेर येथिल रमाई महिला मंडळातर्फे येथिल तक्षशीला बुद्ध विहारात दि. १२ डिसेंबर रविवार रोजी चैत्यभूमीचे जनक भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची १०९ वी जयंती साजरी करण्यात आली.[ads id="ads1"]
याप्रसंगी नगरसेविका रंजना गजरे यांनी भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून धूपपूजा, दीपपूजा केली. भैय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन सर्वानी सामूहिक वंदना घेण्यात आली. यावेळी संगीता ससाणे यांनी मनोगत व्यक्त केले.[ads id="ads2"]
कार्यक्रमांस रजनी सपकाळे, सुमन कोंघे,ज्योती दाभाडे,संगीता ससाणे, संगीता अटकाळे,सुनीता मेढे,उज्वला सुरदास,वैशाली अढांगळे, प्रमिला लोंढे, सोनाली वाघ,शुभांगी अढांगळे,भूमिका अढांगळे, प्रियांका गजरे, हर्षदा सुरदास, गार्गी गजरे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संगीता दामोदरे, आभार संगीता अटकाळे यांनी केले.
हेही वाचा : - टेहू येथील जवानाचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू

