मुक्ताईनगर प्रतिनिधी (संजीव तायडे) शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धशहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या अर्धपुतळा कृती फुले शाहू आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या चबूत- याला जोरदार धडक दिली.सदर घटना आज रात्री सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली.[ads id="ads1"]
व या ठिकाणी मोठा जमाव जमला व मोठा तणाव निर्माण झाला ही परिस्थिती हाताळण्यासाठी डीवायएसपी व पोलीस प्रशासन यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत गर्दी पांगली याबाबत अधिक माहिती अशी की ,[ads id="ads2"]
मध्य प्रदेश बु-हाणपुर कडून मुक्ताईनगर कडे एम .पी. 09 एच जी 9666 या अनाधिकृतपणे गुर वाहून नेणाऱ्या मोठ्या ट्रकने भरधाव वेगाने येऊन आज रात्री (दिनांक १२डिसेंबर) रोजी सव्वा दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात असलेल्या महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या चबुतराला धडक दिली.
हेही वाचा : - टेहू येथील जवानाचा अपघात झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू
धडक इतकी जोरात होती की आजूबाजू च्या अर्धा किलो मीटर अंतरावर आवाज पोहोचला मोठ्या आवाजाने घटनास्थळी मोठा जमाव जमला गो वंश असलेला ट्रक भरधाव वेगाने प्रवर्तन चौकातून औरंगाबाद कडे जात होता त्यामुळे प्रवर्तन चौकातील पुतळ्यांच्या पुतळ्यांचा चबूतरा तुटला सुदैवाने त्यात रान होणे झाले नाही त्यात एका दुचाकीवरुन जाणाऱ्या लहान मुलगी तिचे वडील यांनी वाहन सोडून दिल्याने बालंबाल बचावले धडक दिल्यानंतर त्या ट्रक चालकाने आपला जीव मुठीत घेऊन पळ काढला ही घटना संस्था बरोबर मुक्ताईनगर पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड यांच्यासह पोलीस निरीक्षक राहुल खताळ पोलीस उप निरीक्षक सुदाम काकडे तसेच मोठा पाऊस फाटा या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर झाले व मोठा दमलेला जमा पांगविण्यासाठी यशस्वी झाले या ठिकाणी कोणत्याही प्रकार चा तणाव निर्माण होऊ नये यासाठीभारतीय बौद्ध महासभेचे नाशिक विभागाचे सचिव के वाय सुरवाडे तसेच तालुकाध्यक्ष शरद बोदडे नगरसेवक बापू ससाने सुधाकर बोदडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई गोपाळ सोनवणे पंचशील टेलर रवींद्र बोदडे ऍडराहुल पाटील तसेच काही सामाजिक कार्यकर्ते यांनीनी काळजी घेतली त्यानंतर तात्काळ गोवंश असलेला त्या घटनास्थळ स्थळावरून हलविण्यात आला पोलिस प्रशासनातर्फे नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यासोबतच बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तर्फे आवाहन करण्यात आले आहे की महापुरुषांचे पुतळे सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची तूट झालेली नाही त्यामुळे जनतेने शांततेचे सहकार्य करावे तसेच उद्या दिनांक 13 रोजी सकाळी नऊ वाजता सामूहिकबुद्ध वंदना त्रिशरण पंचशील घेण्यात येणार असून तालुक्यातील सर्व बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : - सरपंचांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा ; सरपंच परिषदेचा इशारा
डीवायएसपी विवेक लावंड तसेच पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनीसुद्धा जनतेला शांततेचे आवाहन केले आहे इतकेच नव्हे तर पुतळ्याच्या कबूतर याचा तुटलेला भाग तात्काळ दुरुस्त करण्यात येईल या असे आश्वासनही दिले दरम्यान त्यापूर्वी मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी येथे अनधिकृतपणे गुरांची तस्करी करणारा ट्रक पकडण्यात आला होता चौकात नेहमी वर्दळ असते परंतु सुदैवाने प्राणहानी टळली व परिस्थिती सध्या शांतता पूर्वक असून तणावाखाली आहे.