रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) सावदा - येथून जाणाऱ्या भुसावळ चित्तोडगड महामार्गावर गुरुवार सकाळी दहा वाजून 30 मिनिटांनी इंडिका व फॉर्च्यूनर या दोघा गाड्यांचा मोठा अपघात झाला होता . यात मोठे वाघोदा येथील भावना सुपे या महिलेचा मृत्यू झाला होता.[ads id="ads2"]
या अपघातात दोन गंभीर जखमी तर तीन किरकोळ जखमी असे पाच जण जखमी झाले होते.या अपघातात रावेरतालुक्यातील इंडिका गाडीतील रावेर येथील व्ही.एस.नाईक विद्यालयाचे चेअरमन यांच्या परिवारातील रेखा हेमंत नाईक वय ४० यांचे वर जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
उपचारा दरम्यान अपघातातील जखमी रेखा नाईक या महिलेचा आज शनिवार रोजी मृत्यू झाला.

