तलवार हल्ल्यातील तरूणाचा मृत्यू ; संपूर्ण जळगाव हादरले.

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) शहरातील मेहरूण येथील तरूणावर काल करण्यात आलेल्या तलवार हल्ल्यात रात्री उशिरा मृत्यू झाल्याने संपूर्ण जळगाव शहर हादरले असून मोठी खळबळ उडाली आहे.ही
हत्त्या पूर्व वैमनस्यातुन झाली असल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. 
[ads id="ads2"]
जळगाव शहरात अनेक ठिकाणी गटातटाचे आणि भांडणाचे तंटे आहेत शहरात दोन गटांमधील रक्तरंजीत संघर्ष अनेकदा उफाळून आल्याचे दिसून येते. अशाच प्रकारे काल दि4 रोजी रात्री एका तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून आज दि.5 रोजी सकाळी त्या तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
[ads id="ads1"]
मेहरूणमधील पवन उर्फ घातक मुकंदा सोनवणे या तरूणावर रात्री दोन जणांनी तलवारीने,धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला होता. यात तो तरुण जबर जखमी झाल्याने त्याला रात्री उशीरा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते,औषध उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाल्यानेमोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दुसऱ्या बाजूने पोलीस सखोल चौकशी कामी लागले आहे.पवनवर सागर खंडारे आणि दीपक सपकाळे यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्या दिशेने शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.जळगाव एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलिसांनी आपले लक्ष केंद्रित केले असून कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून समजले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!