रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे) रावेर येथे अखिल भारतीय शिक्षा संस्थान संबंधित विद्याभारती देवगिरी प्रांत व यशवंत प्रतिष्ठान रावेर संलग्नित पोळी भाजी केंद्र सेवा प्रकल्पाचे भगवंत चरणी भोग अर्पण करून महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज,ऋषिकेश महाराज यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
[ads id="ads2"]
सच्चिदानंद महाराज समाधीस्थान हनुमान मंदिर रावेर या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री दिलीप रामू पाटील (कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य )
श्री प्रकाश भिवसन पोतदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक विद्याभारती प्रांत मंत्री देवगिरी प्रांत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. महामंडलेश्वर यांनी आपल्या उद्बोधनात प्रत्येक माणसाला पोट असते व पोटाला भूक असते त्यासाठी समाजाने समाजासाठी सुरू केलेला हा सेवा प्रकल्प अविरतपणे व अखंडितपणे समाज घडवत राहील याची आपणास सर्वांना मिळून योजना करायची आहे असे आवाहन केले आपल्या आवाहनात फैजपूर येथे गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला बुधवार रोजी चालणारा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहेत त्यांनी आवर्जून सोदाहरण मांडला अन्नदान हे श्रेष्ठदान आहे अन्नदानासाठी अधिकाधिक लोकांनी समोर येऊन हा विषय सांभाळला पाहिजे विविध कार्यक्रमांमध्ये,भंडार यांमध्ये भोजनाची होणारी नासाडी यावरही त्यांनी आपले भाष्य केले. आदरणीय प्रकाश जी पोद्दार सरांनी विद्याभारती चा थोडक्यात परिचय करून दिला विद्यार्थ्यांना क्रिया कल्पा वर आधारित शिक्षण प्रणाली उभी करून मूल्याधिष्ठित कालसुसंगत शिक्षण मिळण्याचा प्रयत्न विद्याभारती च्या माध्यमातून सुरू आहे त्यासोबतच सर्व क्षेत्रात विद्याभारती प्रशिक्षण देत असते त्या प्रशिक्षणाचा उपयोग सर्वांच्या वैयक्तिक जीवनाच्या जीवनशैली उंचवट्यावर होत असतो असे मनोगत व्यक्त केले आदरणीय दिलीप रामू पाटील यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ना यासारखे अनेक विषय हाताळण्याची सवय विद्यार्थी परिषदेचे काम करत असताना होत असते समाजातील विविध गोष्टींचा चिंतन करून समस्या शोधून त्याचा निवारण करणं, त्यावर उपाय सांगणे .यासारखे विविध विषय सुरू करणं. हे काम विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रावेर शहरातील यशवंत प्रतिष्ठान रावेर च्या माध्यमातून सुरु असलेले विविध प्रकल्प आहेत. किलबिल अकॅडमी रावेर या पूर्व प्राथमिक शाळेत मातृभाषेतून शिक्षण देण्याचे कार्य चालू आहे.
यापूर्वी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र च्या माध्यमातून रावेर परिसरातील दीडशे जण विविध क्षेत्रात नोकरी झालेले आहेत पर्यावरण पूरक गणेश उत्सव असोत अथवा निर्माल्य संकलन असो अशा विविध आघाड्यांवर यशवंत प्रतिष्ठान काम करत आहे. रावेरमध्ये रक्तदान चळवळ अधिक बळकट होण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून जनजागरण रक्तगट सूची बनवणं रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे. महिला सशक्तिकरण व सबलीकरण म्हणून स्किल डेवलपमेंट कोर्सेस उदाहरणार्थ ब्युटी अँड वेलनेस सेविंग मशीन ऑपरेटर इत्यादी विषय नेहमीच सुरू असतात. आदरणीय स्वर्गीय प्रा.यशवंतराव केळकर या व्यक्तिमत्वच्या प्रेरणेतून सुरू झालेले यशवंत प्रतिष्ठान आज या टप्प्यावर आल्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे आपल्यासारख्या महानुभावांचे आशीर्वाद व सहकार्याच्या जोरावर या सर्व कार्यकर्त्यांना अधिक कामाची ऊर्जा मिळत राहो याच माझ्या शुभेच्छा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनीच सक्रिय सहभाग नोंदवला तुषार महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित लोणारी यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निशिकांत पाटील यांनी केले रावेर शहरातील व्यापारी वैद्यकीय व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक महिला व्यवसायिक सोबत अनेक शिक्षक वकील मंडळी उपस्थित होती.यां उपक्रम यशस्वी ते साठी लोकेश महाजन, राहुल महाजन, नीलकंठ महाजन, नबी तडवी, दिनेश बारेला, निलेश पाटील यांनी परिश्रम घेतले.