ट्रकने रिक्षाला उडविले ; जागीच दोन जण ठार, चार जण गंभीर जखमी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जामनेर ते गारखेड्याच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. लाकडाने भरलेल्या ट्रकने प्रवासी वाहून नेणाऱ्या पॅजो रिक्षाला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे.[ads id="ads1"] 

यात दोन जण जागीच ठार झाले आहेत, तर चौघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी घडलीय.

सदर अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना रूग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. जखमींना जामनेर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते.[ads id="ads2"] 

याबाबत असे की, लाकडाने भरलेला ट्रक जामनेरकडून भुसावळकडे भरधाव वेगाने जात होता. तर समोरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा येत होती. गारखेडा गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिली. यात दोन जण जागीच ठार झाले असून दहापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा :- धक्कादायक : पैश्यांसाठी जादूटोणा करून महिलेची हत्या ! 

अपघात इतका भीषण होता की, यात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली असून ट्रक देखील रस्त्यावर उलटला असून याचा चालक आणि क्लिनरला देखील दुखापत झाली आहे. या अपघातामुळे या मार्गावरील वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला. दरम्यान पोलिसांनी अपघातस्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली आहे. जखमींना जामनेर रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!