गुर्जर बोली भाषेचे संवर्धन काळाची गरज- भागवत पाटील
ऐनपुर प्रतिनिधी (विजय एस अवसरमल) ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात गुर्जर बोली भाषा व साहित्य संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत विश्वनाथ पाटील होते. [ads id="ads1"]
प्रास्ताविक Ainpur महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी केले. गुर्जर बोली भाषेतील संपादित ग्रंथ तसेच गुर्जर बोली भाषेतील साहित्य संमेलन घेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. भाषेचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी सदर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे असे त्यांनी नमूद केले. [ads id="ads2"]
सूत्रसंचालन केंद्राचे समन्वयक प्रा संजय महाजन यांनी केले. उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री श्रीराम पाटील यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रामदास महाजन, संचालक विकास महाजन,प्रकाश चौधरी ,प्रा डॉ किशोर कोल्हे,प्रा नीता वाणी, यांनी आपले विचार मांडले. अध्यक्ष भागवत पाटील यांनी गुर्जर बोली भाषा व साहित्य संवर्धन केंद्राची स्थापना करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले.मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त सदर केंद्राची स्थापना मराठी विभागाशी संलग्लीत करण्यात आली.
मराठी भाषेचे प्रशासनातील महत्व मराठी विभाग प्रमुख डॉ रेखा पाटील यांनी विषद केले. मराठी चे प्रा महेन्द्र सोनवणे यांनी बोली भाषा व मराठी भाषा यांचा तुलनात्मक अभ्यास मांडला. आभार प्रदर्शन डॉ सतीश पाटील यांनी मानले. याप्रसंगी ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक जगन्नाथ पाटील, प्रल्हाद पाटील,सूदेश पाटील, कैलाश पाटील,हरी पाटील, प्रविण महाजन, डॉ सतिश पाटील,आर एस पाटील, महाविद्यालय विकास समिती सदस्य दिलीप पाटील, रविन्द्र पाटील, पांडुरंग पाटील, सुमित पाटील तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

