यावल दि.22(सुरेश पाटील) आज दिनांक २२ शनिवार रोजी सकाळी ११वाजता सातोद कोळवद येथील इंदिरा नगर (Indira Nagar) मध्ये क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे भाजपा (BJP)जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील हॆ होते,उदघाटक म्हणून यावल (Yawal)येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तथा स्रीरोग तज्ञ डॉ.कुंदन फेगडे होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमात डॉ.कुंदन फेगडे यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले आणि सदर स्पर्धे मध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत एकूण ३० संघानी सहभाग घेतला होता या कार्यक्रम चे सूत्रसंचालन वानखेडे सरांनी केले.[ads id="ads2"]
उद्घाटन प्रसंगी भाजपा (bjp) Jalgaon जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,डॉ.कुंदन फेगडे,कोळवद येथील माजी सरपंच संजय कोळी,सरपंच सौ.जाऊबाई भिल,पांडुरंग पाटील,गोविंदा सावळे,भागवत आशिष मोरे, राजेंद्र सूर्यवंशी,मधुकर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी,राजरत आढाळे, दिपक पाटील,विकी मोरे, इकबाल तडवी,सागर लोहार, विशाल बारी,संजय फेगडे, इत्यादी ग्रामस्थ,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
या स्पर्धेला हर्षल सोनवणे, इकबाल तडवी,तुषार चौधरी, संदीप कोळी,यशोदीप भिरूड, फारूक तडवी,शाहरुख,गणेश कोळी,जावेद तडवी,राहुल कोळी यांचे सहकार्य लाभले या स्पर्धेचे आयोजन मयराफ तडवी,दिपक कोळी धनराज कोळी,चेतन कोळी राजू तडवी यांनी केलेले आहे.

