तर ते ग्रामस्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष असल्याने Raver Tahsildar तहसीलदार यांच्यावतीने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याने सरपंच पदही धोक्यात आले आहे. प्रांताधिकारी यांनी त्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना तहसीलदारांना दिल्या आहे.[ads id="ads2"]
Patondi येथील सरपंच मोहन बोरसे (Sarpanch Mohan Borse) हे पुनखेडा(Punkheda) शिवारातून भोकर नदी पत्रातून ट्रक्टरने वाळू चोरी करत असल्याचे सोमवारी मध्यरात्री पोलिसांना आढळून आल्याने त्यांच्यावर Raver पोलिसात पोलीस नाईक सुरेश मेढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली आहे. ग्राम स्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून परिसरातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी सरपंच असलेल्या मोहन बोरसे यांच्यावर असतांना त्यांच्याकडूनच चोरी झाल्याने, तहसीलदार यांच्यावतीने त्यांचे सरपंचपद अपात्र करण्याबाबत प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी आज रावेर तहसील कार्यालयात दिल्या सरपंच बोरसे यांना वाळू वाहतूक चांगलीच महागात पडणार आहे.
प्रशासनाची दिशाभूल करत होता सरपंच
पोलीस आणि महसूल प्रशासनाने सांगितले की प्रशासनाची सरपंच दिशाभूल करत होता ज्या बाजूने वाळू वाहतूक होते त्याच्या विरुद्ध बाजूने वाळू वाहतूक होत असल्याचे शहाजोग पणाने फोन करून प्रशासनास वेठीस धरत होता. आणि स्वतः तिकडे वाळूचे ट्रॅक्टर चालवत असल्याचे पोलीस व महसूलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

