रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे बालकांच्या हत्याकांडाचा गुणात्मक सर्वोत्कृष्ट तपास केल्याबद्दल सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंधा, एलसिबी तात्कालिक पो.नि.बापु रोहोम, रावेर पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार नाईक, हेकाँ. बिजू जावरे या तपास पथकाला राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालकांनी १० हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला.[ads id="ads1"]
त्याबद्दल श्रीराम फाउंडेशनच्या वतीने सपोनि शितलकुमर नाईक साहेब व हेकाँ बीजू जावरे साहेब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन श्रीराम फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्योजक श्रीराम पाटील यांनी सत्कार करुन त्यांचे अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..![ads id="ads2"]
यावेळी पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे साहेब, दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा.गोपाल दर्जी सर, जळगांव जिल्हा ड्रिप असोसिएशनचे अध्यक्ष सोपान पाटील, राजेंद्र चौधरी, शांतीलाल पाटील,घन:श्याम पाटील उपस्थित होते.

