Jalgaon Crime : जळगावमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशीच अत्यंत दुर्देवी घटना ! पतंगांनी घेतला 2 लेकरांचा जीव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


  जळगावमध्ये मकर संक्रांतीच्या सणा (Makar Sankranti) दिवशीच दोन दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलं आहे. पंतगांच्या नादात दोन मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
[ads id="ads1"] 

एक घटना म्हणजे पतंग उडवण्यासाठी (Playing Kites) जाऊ दिलं नाही म्हणून 12 वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. तर, दुसरी घटना म्हणजे पतंग उडवताना विजेच्या तारांचा धक्का लागल्याने 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Died) झाला. आहे. या दोन्ही घटना एकाच दिवशी घडल्या आहेत. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जातेय.[ads id="ads2"] 

  याबाबत माहिती अशी, जळगाव शहरापासून (Jalgaon News) काही अंतरावर असलेल्या कुसुंबा गावामध्ये (Kusumba) पतंग उडवत असताना विजेचा शॉक लागून हितेश ओंकार पाटील (Hitesh Omkar Patil) (वय. 8) याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. हितेशचं पतंग विजेच्या तारांवर अडकलं होतं. ते पतंग काढताना त्याला विजेचा शॉक लागला असल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon Crime)

  दरम्यान, जळगाव शहरातील कांचननगरात (Kanchan Nagar) येथे पतंग उडवण्यासाठी जाऊ दिले नाही म्हणून यश रमेश राजपूत (Yash Ramesh Rajput) (वय. 14) या मुलाने झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suiicde in Jalgaon) केली आहे. या दोन्ही दुर्देवी घटनानंतर दोन्ही कुंटूंबीयाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!