देशभरात कोरोनाचे संकट वाढत असतानाच बऱ्याच राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यात आता राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे.[ads id="ads1"]
गुलाबराव पाटील यांनी स्वत; ट्विट करून माहिती दिली.शिवसेनेचे जळगाव मधील आमदार तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कोरोना रीपोर्ट पाॅझिटीव्ह आला असून ह्याबाबतची माहिती स्वतः गुलाबराव पाटील यांनी ट्विटरद्वारे दिली.[ads id="ads2"] त्यांची प्रकृती चांगली असून ते गृहविलगीकरणात असल्याचे समजते आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे व लक्षणे आढळल्यास कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहनही केले आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार सुरू आहेत.आपणां सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच मी आपल्या सेवेकरीता हजर होईन.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी
— Gulabraoji Raghunath Patil (@GulabraojiP) January 14, 2022

