जळगाव : तालुक्यातील शिरसोली येथील 22 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी घातपात केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. [ads id="ads1"]
याप्रकरणी एमआयडीसी Jalgaon MIDC Police पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राजक्ता उर्फ कोमल अजय बारी (22, रा.शिरसोली प्र.न., ता.जि.जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.[ads id="ads2"]
आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राजक्ता अजय बारी या व्यवसायाने चालक असलेल्या पती अजय अशोक बारी यांच्यासह वास्तव्यास होत्या. विवाहिता या सासू, सासरे, जेठ व जेठाणी यांच्यासोबत एकत्र कुटुंब पद्धत्तीने रहावयास होत्या. प्राजक्ता या विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावर मध्यरात्री साडीने गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. नातेवाईकांनी त्यांना Jalgaon Civil Hospital जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.
मावसभावाने केला घातपाताचा आरोप
दरम्यान विवाहितेने आत्महत्या केलेली नसून तीचा खून करण्यात आला आहे. असा आरोप विवाहितेचा मावसभाऊ प्रल्हाद सुकलाल फुसे (रा. शेंदुर्णी, ता.जामनेर) यांनी केला आहे. विवाहितेचे पती आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विवाहितेच्या माहेरच्यांनी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस Jalgaon MIDC Police ठाण्यात करण्यात आली. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

