यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात नालाबांध,रस्ते,पुलाची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची ; राजकीय प्रभावामुळे आणि टक्केवारी मुळे ठेकेदारांची चांदी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 यावल विशेष प्रतिनिधी (सुरेश पाटील) यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात जिल्हा परिषद जळगाव व यावल पंचायत समिती मार्फत विविध विकास कामे जे होत आहे त्यापैकी 95 टक्के विविध बांधकामे ही राजकीय प्रभावामुळे आणि काही ठेकेदारांकडून टक्केवारी वाटप केली जात असल्याने तसेच अनेक ठिकाणी झेरॉक्स ठेकेदाराना,काम करण्याची माहिती नसलेले, आवश्यक यंत्रसामग्री नसलेले काही ठेकेदार अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करीत असल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]  

        यावल तालुक्यात यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात विविध रस्त्यांची बांधकामे, फुलाची बांधकामे,पुलावरील  गटावर ढापे,घरकुले,नाला बांध, पाणी आडवा पाणी जिरवा अंतर्गत विविध कामे अत्यंत निकृष्ट प्रतीची होत असल्याने नायगाव,किनगाव,पाडळसे येथील मनुदेवी रस्त्यावर भालोद, बामणोद परिसरात किनगाव डांभुर्णी,डोंगर कठोरा,सातोद कोळवद,वड्री भागात अत्यंत निकृष्ट प्रतीची कामे होत आहे तर काही कामे संबंधितांना टक्केवारी मिळत नसल्याने बंद आहेत.[ads id="ads1"]  

       यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून  काल दिनांक 18 रोजी IAS अधिकारी नेहा भोसले यांनी पदभार स्वीकारला त्यांनी यावल तालुक्यातील झालेल्या विविध बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केल्यास निकृष्ट कामांचे फार मोठे रॅकेट उघडकीस आल्या शिवाय राहणार नाही असे अहवाल तालुक्यात बोलले जात आहे.

हेही वाचा :- पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला बालकास चावा ; यावल येथील घटना 


#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!