यावल प्रतिनिधी : यावल शहरातील बाबानगर भागातील रहिवासी सहा वर्षीय बालकास सोमवारी सायंकाळी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. बालक त्यात गंभीर अहमद रजा जखमी झाला. शेख सईद यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले.[ads id="ads1"]
यावल शहरातील बाबानगर भागात खडकाई नदीपात्रात सोमवारी सायंकाळी लहान मुले खेळत होती. यावेळी तेथे आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने अहमद रजा शेख सईद (वय ६) या बालकावर हल्ला चढवला. बालकाच्या तोंडाचा त्याने लचका तोडला.[ads id="ads2"]
यामुळे बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहून बाजूलाच असलेले नागरिक मदतीसाठी धावून गेले. त्यांनी बालकाची कुत्र्यापासून सुटका करून त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले.
येथे डॉ. शुभम तिडके, अधि परिचारिका मंजूषा कोळेकर, कादर तडवी यांनी प्रथमोपचार केले. तातडीने मोठ्या शस्त्रक्रियेची अवश्यकता समोर आल्याने त्याला तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मंगळवारी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

